Pune Crime : टिळक रस्ता, सारसबाग परिसरात महिलांचे दागिने हिसकावले

पुणे – टिळक रस्ता तसेच सारसबाग परिसरात महिलांचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार पर्वती गाव परिसरात राहायला आहेत.

मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास त्या दुचाकीवरून टिळक रस्त्याने निघाल्या होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेसमोर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कुरेवाड तपास करत आहेत.

मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास सारसबाग परिसरातील सणस मैदानाजवळ पादचारी ज्येष्ठ महिलेचे ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. ज्येष्ठ महिला बुधवार पेठ परिसरात राहायला आहेत. मंगळवारी सकाळी त्या सारसबाग परिसरात फिरायला आल्या होत्या. त्यांनी याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.