Pune Crime | गुन्हे शाखा युनिट सहाकडून वॉण्टेड गुन्हेगार जेरबंद; 10 लाखाचा ऐवज हस्तगत

पुणे,दि.9 – गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील एक आरोपी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात वॉण्टेड होता.

जयपालसिंग ऊर्फ मोन्यासिंग राजपालसिंग टाक (20, रा. गल्ली नं., गोसावी वस्ती बिराजदारनगर हडपसर) व अमरसिंग जगरसिंग टाक अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात आरोपी जयपालसिंग ऊर्फ मोन्यासिंग टाक हा वॉन्टेड (पाहिजे असलेला) होतो.

तो सोलापूर येथे जाणेसाठी शेवाळवाडी जकातनाका येथे येणार असल्याची खबर पोलीस नाईक नितीन मुंढे यांना मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून जयपालसिंग ऊर्फ मोन्यासिंग राजपालसिंग टाक यास ताब्यात घेतले. त्यास गुन्हे शाखा युनिट-6, कार्यालयात आणले. त्यास विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याचा साथीदार अमरसिंग जगरसिंग टाक याचेसह केल्याचे सांगितले.

यापुर्वी गुन्हयात आरोपी अमरसिंग जगरसिंग टाक यास अटक करण्यात आली असुन त्याचे ताब्यातुन गुन्हयातील सॅन्ट्रो कार, तीन दुचाकी वाहने व सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 6 लाख 44 हजार रुपय किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व त्याचेकडुन एकुण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी जयपालसिंग ऊर्फ मोन्यासिंग राजपालसिंग टाक अटक मुदतीत तपास करता त्याने याचे साथीदारासह चतुश्रृंगी ,लोणीकंद (3 गुन्हे) आणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन(दोन गुन्हे) हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याचेकडुन नमुद गुन्हयामध्ये 7.50 तोळे सोने व चांदी व रोख रक्कम मिळुन एकुण 4 लाख 1 हजार 235 रुपये किमतीचा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिंद्र वाळके हे करीत आहे. पोलीस निरीक्षक, गणेश माने, अंमलदार नितीन मुंढे, मच्छिंद्र वाळके, ऋषिकेश टिळेकर, राहुल माने, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे व संजय देशमुख यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.