Pune Crime | कुत्रा चावल्यामुळे फुरसुंगीत राडा, वाहनांची तोडफोड

पुणे,दि.9 -कुत्रा चावल्याचा जाब विचारल्याचा राग आल्यामुळे टोळक्‍याने महिलेला शिवीगाळ करून परिसरात दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करण्‌यात आली.

ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेअकराच्या सुमारास फुरसुंगीतील हरपळेनगरमध्ये सुमारास घडली.

कार्तिकी भुजबळ, प्रशांत देवडे, राहूल कांबळेसह इतर 3 ते 4 जणांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता नाईक (45 ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता यांच्या मावस बहिणीचा मुलगा दुर्गेश गायकवाडला कार्तिकी भुजबळ यांच्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे त्याचा जाब विचारल्यामुळे कार्तिकी आणि अनिता यांच्यात वाद झाला होता. त्याच रागातून दोन दिवसांपुर्वी रात्री पावणे अकराच्या सुमारास टोळक्‍याने अनिता यांना शिवीगाळ करून धमकी दिली. त्याशिवाय परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. ढावरे तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.