pune crime | करोनात बेरोजगार तरूणाने पत्नी व लहान मुलाचा खून करून केली आत्महत्या

पुणे – कामधंदा नसल्याने बेरोजगारीस कंटाळून एका युवकाने पत्नी व लहान मुलाची निघृण हत्या करुन केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ९ रोजी सकाळी ११:०० ते ११:३० वाजण्याचे दरम्यान कदमवाकवस्ती येथे युवक हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय,३८वर्षे ) याने कामधंदा नसल्याने बेरोजगारीस कंटाळून तसेच, आर्थीक अडचणीचे कारणावरुन त्याची पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे (२८) हिचा गळा दाबून व लहान मुलगा शिवतेज हनुमंत शिंदे (१वर्ष २ महिने ) याचे गळयावर सुरीने कापून दोघांचाही खून केला.

यानंतर स्वतः बेडरुम मधील पंख्यास ओढणी बांधून त्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्याबाबत त्याचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे यांनी दिलेले फिर्यादी वरुन लोणीकालभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळास कल्याणराव विधाते सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, राजेंद्र मोकाशी ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, यांनी तात्काळ भेट दिली असून त्यांचे मार्गदर्शना खाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक  शेंडगे हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.