पुणे – एका विधीसंघर्षित बालकाकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या वाहनांची किंमत 1 लाख 10 हजार इतकी आहे. त्याच्याकडून खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख यांना एक खबर मिळाली की काशेवाडी भागात विधीसंघर्षित बालक चोरीच्या दुचाकी फिरवत आहे.
त्यानूसार पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याचे ताब्यात एक ऍक्टीवा गाडी मिळुन आली त्या गाडी बाबत त्याच्याकडे चौकशी करता सदरची गाडी त्याने सेवन लव चौकातुन चोरल्याचे कबुल केले. ही गाडी चोरी गेल्याची तक्रार खडक पोलीस ठाण्यात दाखल होती. त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने आणखी दोन वाहने चोरल्याचे सांगितले. ही वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
विधीसंघर्षित बालकास दुचाकी फिरवण्याची हौस होती. परंतु घरी दुचाकी नाही आणि विकत घेऊ शकत नाही म्हणून हौस भागवण्यासाठी वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर, सतिश भालेकर, महेश बामगुडे यांनी केली आहे.