पुणे – परप्रांतीय कामगाराला व्याजाने दोन लाखांची रक्कम देउन बदल्यात तब्बल साडेचार लाख रुपयांची लुट करणाNया दोघांना खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली. ज्ञानेश्वर किसन पवार वय ४२ रा. वैदूवाडी हडपसर आणि त्याचा साथीदार ओंकार संदिप तिवारी वय २३ कोढवा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ओमप्रकाश बुधाई गुप्ता रा.वडगाव धायरी यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारदार ओमप्रकाश गुप्ता परप्रांतीय कामगार असून त्यांना घरगुती कारणास्तव पैशाची गरज भासली होती. त्यानुसार त्यांनी आरोपी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून १ लाख ३५ हजारांचे कर्ज घेतले होते. त्याबदल्यात १० टक्के व्याजाने मिळून त्यांनी आरोपीला २ लाख ४५ हजार रूपये माघारी दिले होते. व्याजापोटी एकूण साडेचार लाख रूपये घेतले होते. त्यानंतरही आरोपी पवार हे गुप्ता यांच्याकडून आणखी अडीच लाखांची मागणी करीत होते. आरोपीच्या त्रासाला कंटाळून गुप्ता यांनीखंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रारी अर्ज केला होता.
पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांच्या पथकाने आरोपी ज्ञानेश्वर पवार आणि ओंकार तिवारी यांना वॅâम्प परिसरात गुप्ता यांच्याकडून अडीच लाख रूपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत अवचर, प्रदिप शितोळे, विजय गुरव, सौदावा भोजराव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळूंके, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे. संग्राम शिनगारे, राहुल उत्तरकर प्रविण पडवळ, प्रदिप गाडे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर आशा कोळेकर यांनी केली.