Pune Crime | पुण्यात बनावट करोना टेस्ट रिपोर्ट देणाऱ्यांचा सुळसुळाट; दोघांना अटक

पुणे – शहरात कोरोना चाचणीचे (आरटीपीसीआर) बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. जंगली महाराज रस्त्यावरील एका वैद्यकीय चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेच्या नावाने आरोपींनी बनावट रिपोर्ट दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी सागर अशोक हांडे ( २५, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौकाजवळ, मूळ रा. द्रावणकोळा, जि. नांदेड), दयानंद भीमराव खराटे  ( २१, सध्या रा.वारजे माळवाडी, मूळ रा. भोगजी, जि. धाराशिव) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रयागेशाळेतील व्यवस्थापक रुपेश नाळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हांडे आणि खराटे हे जंगली महाराज रस्त्यावरील एका प्रयोगशाळेच्या नावाने कोरोना चाचणीचे बनावट अहवाल देऊन पैसे उकळले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी तांत्रिक तपास करून दोघांना अटक केली. उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त मालोजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहाय्यक निरीक्षक बाबासाहेब झरेकर, उपनिरीक्षक अभिजीत कुदळे, इनामदार, देवडे, शिंदे, पाटील, पानपाटील आदींनी ही कारवाई केली.

नागरिकांना कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाNया दोघांना अटक केली आहे. लोकांकडून पैसे घेऊन त्यांचे बनावट रिपोर्ट दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
– मुरलीधर करपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.