पुणे – अमेरिकेतील नासा येथील आरपी धातुचे मौल्यवान भांडे विक्री करायचे आहे, त्यातून 500 कोटी रुपये मिळवून देण्याच्या अमिषाने 49 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात तीन महिलांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्या तिघींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
त्यातील एक सांगवीची, तर दोन कोथरूड येथील रहिवाशी आहेत. अन्य तिघांवर गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील 49 लाख रुपये जप्त करण्यासाठी, तसेच भारत सरकारचे असलेले सर्टिफिकेट दाखवून ही रक्कम स्विकारली आहे. ते सर्टिफिकेट कोठून आणले, आणखी किती जणांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे, त्याच्या शोधासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. तर एका महिलेच्या वतीने ऍड. कमलेश गावडे आणि ऍड. ईश्वर चव्हाण यांनी बाजू मांडली. 19 जून 2019 ते 2 जून 2022 या कालावधीत हा प्रकार घडला.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळवून देण्याचे तसेच, अमेरिकेतील मौल्यवान धातुंच्या विक्री 5 हजार कोटी रुपयांना करायची आहे . त्यातून 500 कोटी रुपये मिळवून देण्याच्या अमिषाने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुभाष ससार यांनी याबाबत हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.