पुणे – शहरात मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून विमाननगर भागात एका युवतीसह दोघांचे मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.
याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती, तिचा भाऊ, चुलत बहिण विमाननगर भागातील मलबार हॉटेलसमोरील पदपथावरून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास निघाली होती. त्या वेळी समोरून आलेल्या चोरट्याने युवतीच्या हातातील पंचवीस हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. युवतीने आरडाओरडा केला. चोरटा आणि त्याच्या बरोबर असलेला साथीदार दुचाकीवरुन पसार झाला.
दरम्यान, विमाननगरमधील फिनिक्स मॉलसमोर पादचारी सईद मोहम्मद (वय ३०, रा. खराडी) याचा मोबाइल संच चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव तपास करत आहेत.