Pune Crime | घरमालकाची नजर चुकवून मोलकरणीचा ४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; गुन्हा दाखल

पुणे, दि. ९ (प्रतिनिधी)-   मोलकरणीने घरमालकाची नजर चुकवून ३ लाख ९० हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना २७ एप्रिलला कल्याणीनगरमधील पिकॉक पॅलेस लेन क्रमांक १० मध्ये घडली.

याप्रकरणी सुनीता लष्करे (वय ३३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव आहे. संदीप ठुसू (वय  ३३, रा. कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता काही महिन्यांपासून संदीप ठुसू यांच्याकडे घरकाम करीत होती. २८ एप्रिलला तिने संदीप यांची नजर चुकवून घरातील ३ लाख ९० हजारांचे दागिने चोरून नेले.

सुनीता कामावर न आल्यामुळे संदीप यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी घरातील दागिने पाहिले असता, मिळून आले नाहीत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.