पुणे – पीएमपी प्रवासी महिलांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट स्थानक परिसरात प्रवासी महिलेच्या पिशवीतील दीड लाखांची रोकड चोरट्याने लांबविली.
याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे गावच्या आहेत. त्यांचे गावात दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी त्या शहरात खरेदीसाठी आल्या होत्या. हडपसर परिसरातून त्या पीएमपी बसने स्वारगेट परिसरात उतरल्या. बस प्रवासात चोरट्याने त्यांच्याकडील पिशवीची चेन उघडून दीड लाखांची रोकड लांबविली.
स्वारगेट स्थानकात त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे तपास करत आहेत.