#pune crime | तीन वर्षापासून पाहिजे असलेला बालगुन्हेगार ताब्यात

पुणे – मारहाणीच्या प्रकरणात तीन वर्षापासून वॉंण्टेड असलेल्या बालगुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा केल्यापासून तो पोलिसांना चकवा देत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वारगेट पोलिसांच्या तपास पथक हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना वॉण्टेड असलेला 17 वर्षीय बालगुन्हेगार हा गुलटेकडी येथील मीनाताईठाकरे वसाहत या ठिकाणी आला असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार त्यास ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करता दाखल गुन्हा त्याने केल्याची कबुली दिली आहे.नमूद आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास मा कोर्टात हजर केले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व पोलीस निरीक्षक (गुन्हे)सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अमोल रसाळ ,पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग ,पोलिस अंमलदार विजय कुंभार,लखन धावरे , ऋषी तितमे, शैलेश वाबळे, वैभव शीतकाळ, शंकर गायकवाड ,संदीप साळवे,सोमनाथ कांबळे यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.