Pune Crime | ‘एक फुल दो माली’, पत्नी ठार तर दोन्ही पती जेलमध्ये! एका खूनातून झाली दिड वर्षांपूर्वीच्या खुनाची उकल

हडपसर पोलिसांची कामगिरी

पुणे – फुरसुंगी स्मशानभूमी येथे दिड वर्षापूवी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. हा खूनाचा गुन्हा दुसऱ्या एका खूनाच्या गुन्हयातील आरोपीची झाडाझडती घेत असताना उघडकीस आला. या खूनाच्या गुन्हयातील आरोपीस हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. संतोष सहदेव शिंदे ( धंदा-मजुरी रा. सोमनाथ कामठे आळी, फुरसुंगी, मुळगाव-मु.पो चाकूर ता.चाकूर जि.लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. 

नरसिंग विठ्ठल गव्हाणे(65,रा.फुरसुंगी ) यांच्या खूनाची कबुली दिली आहे. नरसिंग व संतोष दोघेही स्मशानभूमीत एकाच ठिकाणी नशा करण्यास बसत होते. नरसिंग यांना संतोष तेथे येत असल्याचा राग येत होता. यामुळे ते त्याला शिवीगाळ करत असत. या रागातून संतोषने डोक्‍यात फरशीचा तुकडा टाकून नरसिंग यांचा खून 29 डिसेंबरच्या रात्री केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 30 डिसेंबर 2019 रोजी दशक्रिया विधी करण्याचे ठिकाणी फुरसुंगी ता हवेली येथे मयत नरसिंग विठठल गव्हाणे (65, रा. फुरसुंगी जयभवानी चौक ता.हवेली जि.पुणे) यांचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. दगडाने तसेच विटेने डोक्‍यावर व चेह-यावर मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्यांना जीवे ठार मारले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांचे समोर आव्हान होते. 

दरम्यान दिनांक 7/4/2021 रोजी सकाळी 9.30 वाजताचे सुमारास पुरोहीत स्वीट समोर(शिवशक्तीनगर चौक भेकराईनगर) या ठिकाणी सागर बाळु लोखंडे याने त्याची पत्नी शुंभागी सागर लोखंडे ही त्याचेबरोबर त्याचे घरी जात नसल्याचे कारणावरुन तिस चाकुने भोसकुन जिवे ठार मारल्याचा आणखी एक गुन्हा हडपसर पोलिसांमध्ये दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी सागर बाळु लोखंडे याच्याकडे पोलीस त्याच्या गुहयांच्या पुर्व इतिहासाविषयी माहीती घेत होते. यावेळी आरोपी सागर बाळु लोखंडे याने सांगितले की पत्नी शुंभागी यांचे दुसरे लग्न सुमारे वर्ष भरापुर्वी झालेले होते. पत्नी शुंभागी ही पुन्हा तिच्या पहिल्या नव-याबरोबर बोलत असल्याने त्याचा राग मनामध्ये होता. 

त्यावरून त्या दोघांमध्ये वाद होत होता. पत्नी शुभांगी ही यापुर्वी फुरसुंगी भागात तिचा पहीला नवरा संतोष शिंदे याच्याबरोबर राहण्यास होती. एकदा बोलता बोलता रागाच्या भरात पत्नी शुभांगी हि बोलली होती की, माझ्या नव-याने यापुर्वी एक मर्डर केला आहे. जर तु आमच्या दोघांमध्ये आलास तर तो तुला देखील संपवून टाकेन अशी धमकी दिली होती. त्याआधारे आरोपी सागर याचेकडे तिच्या पतीच्या संदर्भाने अधिक माहीती घेता त्याला फक्त त्याचे नाव संतोष पुर्ण नाव माहीती नाही व तो व्यसनी असल्याचे माहीत होते व तो फुरसुंगी गावात राहण्यास होता इतकीच माहीती प्राप्त झाली.

हडपसर पोलीस स्टेशनकडील माहीतगार पोलीस अंमलदार यांना सुमारे दिड वर्षापुर्वी दशक्रिया विधी करण्याचे ठिकाणी फुरसुंगी ता हवेली जि पुणे येथे झालेला खुनाचा गुन्हा हा अद्याप उघड झाला नसल्याचे लक्षात आले. कदाचीत दाखल गुन्हा हा संतोष या इसमानेच केला असावा ही शक्‍यता गृहीत धरून लागलीच तपास पथक तयार करून आरोपी याचे विषयी फुरसुंगी भागात फिरून माहीती घेतली. 

तपास पथकाला संशयीत आरोपी संतोष याचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेतली असता. त्याचे नाव संतोष सहदेव शिंदे ( धंदा-मजुरी रा. सोमनाथ कामठे आळी, फुरसुंगी, पुणे. मुळगाव-मु.पो चाकूर ता.चाकूर जि.लातूर) असे असल्याची माहीती मिळाली. तसेच तो फुरसुंगी गाव येथे राहण्यास होता परंतू वर्षापासून तो तेथे राहण्यास नसल्याचे समजले. सध्या तो चिखली येथे असल्याची माहीती मिळाली.  

म्हणून केला खून –

आरोपी संतोष शिंदे हा दशक्रीयाविधी, फुरसुंगी येथे अधुन मधुन दारु पिण्यास जात होता . या ठिकाणी मयत नरसिंग विठ्ठल गव्हाणे हे सुध्दा गांजा व दारु पिण्यास बसत होते . परंतू आरोपी संतोष शिंदे बसत असलेबाबत मयतास आवडत नव्हते व तो त्यास सदर ठिकाणी
बसुन देत नव्हता. यातूनचे त्यास शिवीगाळ करित होता. त्या कारणावरुन त्यास मारण्याचे आरोपीने ठरविले. 

आरोपी 9/4/2021 रोजी हा दारु पिण्यास सदर ठिकाणी गेला असता तेथे अगोदरच मयत नरसिंग गव्हाणे हे गांजा पिण्यास बसले होते त्याठिकाणी आरोपीने त्यास जमीनीवर खाली पाडुन तेथे पडलेल्या विटेचे तुकडयाने व दगडाने डोक्‍यात व चेह-यावर मारुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले. त्यानंतर तो आजपावेतो पोलीसांना गुंगारा देत होता. दाखल गुन्ह्यात आरोपी संतोष सहदेव शिंदे अटक करण्यात आली आहे.

 त्यानंतर आरोपी कोवीड पॉजीटीव्ह आल्याने त्यास उपचारकामी ससुन हॉस्पीटल येथे ऍडमीट करण्यात आले होते तो त्यातुन पुर्ण बरा झाल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची न्यालयील कोठडी मंजुर करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, गुन्हे श्री राजु अडागळे हे करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम पोलीस निरीक्षक(गुन्हे) राजु अडागळे, दिगबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक सैदोबा भोजराव, संदिप राठोड, समीर पांडुळे, अविनाश गोसावी, नितीन मुंढे, पोलीस शिपाई शशिकांत नाळे, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, राहुल मद्देल यांचे पथकाने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.