पुणे – फरासखाना पोलिसांनी गंभीर गुन्हयातील आरोपींना 24 तासात जेरबंद केले आहे. त्यांनी एका तरुणावर भर रस्त्यात शस्त्राने वार केले होते. ही घटना शनिवारी रात्री बुधवार पेठेतील विष्णुपुरावाडा येथे घडली होती.
फिर्यादी निखील तोरडमल याच्या कानावर, कांद्यावर आणी हातावर वार करण्यात आले होते. घटनास्थळी नागरिक जमू लागल्याने आरोपींनी पळ काढला होता. शादाब अरिफ बागवान (22,रा.कोंढवा खुर्द), शोएब अरिफ बागवान(24), अशोक संतोष सिंग (29, रा.काशेवाडी) यांना अटक करुन दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादी निखील मागील पंधरा दिवसांपासून कामावर गेला नव्हता. तो आरोपींच्या परिचयाचा असून घटनेच्यावेळी चौकात गप्पा मारत उभा होता. त्यांच्यामध्ये पुर्वी किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. घटनेच्या दिवशी पुन्हा जुन्या विषयावरुनच वाद झाल्याने हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हा दाखल होताच फरासखाना तपास पथकाने आरोपीयचे शोधकार्य सुरु केले. दरम्यान पोलीस शिपाई क्षीरसागर व पोलीस हवालदार जिनेडी यांना आरोपी कोंढव्यात असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
यातील तीघांनी प्रत्यक्ष हल्ला केला असून इतर दोघे तेथे उपस्थित होते. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार चौधरी, दिघे, बलटे, सरपाले, तुषार खडके, अमोल सरडे, भोकरे, मानमोडे यांच्या पथकाने केली.