Pune Crime: ज्वेलरी शाॅप मध्ये चाेरी करणाऱ्या चाेरट्यांकडून 26 लाखांचा ऐवज जप्त; चौघांना अटक

पुणे – फरासखाना पाेलीस ठाण्याचे हद्दीतील एका ज्वेलरी शाॅप मध्ये चाेरी करणाऱ्या सराईत चाेरट्यांना अहमदनगर जिल्हयातील पारनेर येथून जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथकास यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पाेलीस आयुक्त लक्ष्मण बाेराटे यांनी दिली आहे.

याप्रकरणी सुरेखा ज्ञानेश्वर पवार (वय-२९), नंदा किशाेर पवार (२६), ज्ञानेश्वर अंगद पवार (३०), किशाेर शिवदास पवार (२७, सर्व रा.नालेवाडी, ता.अंबड,जालना) या आराेपींना अटक करण्यात आली आहे. युनिट सहाचे पथकाचे पाेलीस नाईक रमेश मेमाणे यांना माहिती मिळाली हाेती की, ज्वेलरी शाॅपीत चाेरी करणारे गुन्हेगार बीड जिल्हयातील आहे. त्यानुसार पाेलीसांनी आराेपींचा शाेध घेतला असता ते अहमदनगर जिल्हयातील पारनेर येथे असल्याचे दिसून आल्याने पाेलीसांनी त्यांना कारसह ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सखाेल चाैकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून पाेलीसांनी २२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ४९० ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली साडेतीन लाख रुपयांची टाटा झेस्ट कार असा एकूण २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर आराेपींवर जालना, बीड, नाशिक, अहमदनगर, पुणे आदी ठिकाणी गुन्हे दाखल असून ज्वेलर्स शाॅप मध्ये ग्राहकांच्या नजरा चुकवून त्यांच्या बॅगातून किंमती वस्तू, साेन्याचे दागिने चाेरी करणे अशी त्यांची गुन्हे करण्याची पद्धत हाेती अशी माहिती पाेलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.