पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाºया तिघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून सहा इंजेक्शन, दुचाकी असा एक लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ग्रामीण भागात रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती. डॉ. देशमुख यांनी काळ्या बाजारात इंजेक्शनची विक्री करणाºयांविरोधात कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते.
एका इंजेक्शनची विक्री ३२ ते ४५ हजार रूपयांना विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दौंडमधील हुतात्मा चौकात अक्षय राजेश सोनवणे (वय २४, रा. गांधी चौक, दौंड, जि. पुणे) आणि सूरज संजय साबळे (वय २३,रा. शालिमार चौक, दौंड, जि. पुणे) यांना पकडण्यात आले. दोघांकडून दोन मोबाइल संच, तीन रेमडेसिविर इंजेक्शन, दोन मोबाइल संच असा ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर नारायणगावजवळ असलेल्या वारुळवाडीत एकजण इंजेक्शनची विक्री ४५ हजार रूपयांना करत असल्याची माहिती मिळाली. तेथे सापळा लावून पोलिसांनी रोहन शेखर गणेशकर (वय २९, रा. वाणेवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून तीन इंजेक्शन, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात दौंड आणि जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मिलींद मोहिते, विवेक पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक निरीक्षक सचिन काळे, अमोल गोरे, शब्बीर पठाण, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, यांनी ही कारवाई केली.