पुणे – पुण्यातील नामांकित उद्याेजक गाैतम पाषाणकर यांचेवर खराडी येथील यिनयांग प्राेजेक्ट मधील दाेन फ्लॅट ग्राहकांना विक्री केले असतानाही, त्यावर परस्पर दाेन काेटी रुपयांचे बँकेकडून कर्ज काढून फसवणुक करण्यात आल्याचा गुन्हा चंदननगर पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिपालसियह विजयसिंह ठाकाेर (वय-६१,रा.वडनेर, ता.मालेगाव,नाशिक) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. पाषाणकर यांचा खराडी येथे यिनयांग प्राेजक्ट आहे. ठाकाेर यांनी सदर प्रकल्पात ‘सी’ बिल्डींग मध्ये फ्लॅट क्रमांक ९०२ हा एक काेटी ५६ लाख ६४ हजार रुपयांना सन २०१५ मध्ये खरेदी केला हाेता. परंतु त्यानंतर आतापर्यंत त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. त्यांचे प्रमाणेच महिंदर परसराम मनसे (रा.कॅम्प,पुणे) यांनी देखील फ्लॅट सी ८०२ हा ८१ लाख ९० हजार रुपयांना खरेदी केला हाेता. परंतु सदर दाेघांना फ्लॅटचा ताबा न देता त्यांच्यावर व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था, सांगली यांच्याकडून दाेन काेटी रुपये कर्ज काढून तक्रारदार यांची फसवणुक केली.
संबंधित प्रकल्पात अशाचप्रकारे ‘सी’ इमारतीत फ्लॅट १०१ व १०२ हे नरेंद्र पाटील यांनी खरेदी केले हाेते. परंतु त्यांचीही दाेन काेटी ४० लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याने गाैतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात नुकताच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.