पुणे – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एका 19 वर्षीय मुलाला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वृषभ सुधीर शिंदे(19,रा.आंबेगाव पठार) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी व पिडीत 16 वर्षीय मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्याने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्तीने नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केले. यानंतर तीला स्वत:चे नग्न फोटो पाठविण्यास भाग पाडले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के करत आहेत.