पुणे – एका खासगी कार्यालयातील महिलेशी ओळख वाढवत तीला लॉजवर नेऊन नवी साडी नेसायला दिली. यानंतर साडी नेसतानाचे मोबाईलमध्ये फोटो काढण्यात आले. यानंतर तीला अंगावरचे सर्व कपडे काढण्यास सांगण्यात आले.
याचेही चित्रीकरण करत असताना संबंधीत महिलेने हरकत घेतली. तेव्हा तीला मोबाईलमध्ये काढलेले सर्व सगळीकडे पाठविण्याची धमकी दिली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात कदम नावाच्या एका व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने संबंधीत महिलेला तो एका कंपनीत साहेब असल्याचे सांगितले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, येरवडा येथे रहाणारी एक 49 वर्षीय महिला एका खासगी कार्यालयात काम करते. तेथे कदम नावाचा व्यक्ती तीच्या साहेबांना भेटायला आला होता. मात्र तीने करोनामुळे साहेबांना भेटता येणार नाही असे सांगितले. यावेळी आरोपीने गोड बोलून पिडीत महिलेचा मोबाईल नंबर घेतला. पिडीत महिला काम संपवून घरी जात असताना तुमच्यासोबत काम आहे, असे सांगून तीला जबरदस्तीने गाडीत बसवले.
यानंतर तीला पुणे स्टेशन येथील होमलॅंड लॉजमध्ये नेले. तेथे तीला जबरदस्तीने पैसे देऊ केले. मात्र तीने पैसे न घेतल्यावर तीला नवी साडी देऊन ती नेसायला लावली. ही साडी नेसत असताना त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढण्यात आले. यानंतर तीला अंगावरचे सर्व कपडे काढण्यास सांगून त्याचेही फोटो काढण्यास सुरवात केली. मात्र तीने फोटो काढून देण्यास नकार देताच तीला फोटो सगळीकडे पाठविण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे करत आहेत.