पुणे – बांधकाम व्यावसायिकाची गाडी आडवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणात मोक्का कारवाई केलेल्या चॉकलेट टोळीतील रोशन उर्फ डीग्या बाळू शिंदे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. त्याने अँड अजित पवार व अँड प्रणित नामदे, यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
सन 2021 मध्ये एका बांधकाम व्यासायिकास चॉकलेट ऊर्फ धनेश शिंदे याच्या टोळीमार्फत खंडणीची मागणी केली होती. ती मागणी मान्य न केल्यामुळे चोकलेट गॅंगने त्या बांधकाम व्यावसायिकाची गाडी अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी कामशेत पोलिसांमार्फत चॉकलेट गॅंग विरुध्द मोका कायद्या अंतर्गत कार्यवाही केली होती.
या प्रकरणी कारागृहात असलेल्या रोशन बाळू शिंदे उर्फ डीग्या याने न्यायालयात अँड अजित पवार व अँड प्रणित नामदे यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपीचा टोळीप्रमुखा सोबत पूर्वीचा गुन्हा आहे तसेच दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीकडून प्राप्त झालेले हत्यार गुन्ह्यामध्ये वापरण्यात आले नाही, असा बचाव पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजुर केला.