Pune Crime | पोलीस अधिकाऱ्याच्या आईचा खून करणारा अटकेत; चोरीच्या उद्देशाने खून

पुणे : वारजे भागात चोरीच्या उद्देशाने ज्येष्ठ महिलेचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एकाला गुन्हे शाखेने अटक केली.

शहाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर, वारजे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अफसर अस्लम अली (वय १९, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सातारा पोलीस दलातील सहायक निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार (वय ४२, सध्या रा. रविवार पेठ, सातारा) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

रामनगर परिसरात त्यांची आई शहाबाई राहायला आहेत. मध्यरात्री अलीने त्यांच्या डोक्यात पाइप मारला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील ऐवज चोरून तो उत्तर प्रदेशात पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील हवालदार राजेंद्र मारणे यांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.