Pune Crime | घरच्या घरी पोलिसांचा लोगो वापरुन बनावट ‘ई-पास’ची विक्री; एकाला अटक

पुणे – राज्य सरकारच्या Covid-19Mhpolice.gov.in या वेबसाईटवरुन स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता नागरिकांना बनावट ई-पासेस तयार करुन देवुन महाराष्ट्र शासनाची व नागरिकांची फसवणुक करणा-यास सामाजिक सुरक्षा विभाग व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 (गुन्हे शाखा) यांनी जेरबंद केले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरातील पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे,अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करणे तसेच सध्या चालु असलेल्या कोविड- महामारीच्या काळात रेमडिसिव्हीर इंजेक्‍शनचा सारख्या वस्तुंचा काळाबाजार करणारे तसेच लोकांना बनावट दाखले,किंवा रिपोर्ट देणारे लोंकाची माहिती काढुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याबाबत आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत.

कोविड 19 या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन घोषित केले असुन अत्यावश्‍यक सेवा व इतर महत्वाचे कामकाजाकरीता परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाणेकरीता महाराष्ट्र शासनाने Covid-19Mhpolice.gov.in या वेबसाईटवरुन ई-पास संदर्भात ऑनलाईन फॉर्म भरल्याशिवाय परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाणे बंधनकारक केले असुन दिनांक 28/4/21 रोजी सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर कडील पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके हे कर्तव्यावर हजर असताना त्यांना त्यांचे गोपनिय खबर मिळाली की, एक इसम नामे धनाजी गंगनमले (रा. भेकराई नगर, फुरसुंगी, पुणे) हा हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता आपले स्वतःचे मोबाईल व लॅपटॉप वरुन Covid-19Mhpolice.gov.in या वेबसाईटवर नागरिकांचे फॉर्म भरुन ई-पास हा बनावट बनवुन विक्री करत आहे. पोलीसांनी स्टाफसह जावुन खात्री केली असता धनाजी मुरलीधर गंगनमले हा त्याचे राहते घरामध्ये त्याचे स्वतःचे मोबाईल व लॅपटॉपवर Covid19Mhpolice.gov.in या वेबसाईटवरुन ई-पास तयार करुन त्यामधील मजकुरामध्ये फेरफार करत होता.

तो महाराष्ट्र शासनाची व ई-पास धारकाची फसवणुक करुन बनावट ई-पास तयार करुन तो खरा असल्याचे भासवुन त्यावर महाराष्ट्र पोलीसचा लोगो वापरुन ई-पासची विक्री केली होता. यामुळे त्याच्याविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाईपोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त,डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त,श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुरेन्द्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शिल्पा चव्हाण, पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक1 व अतिरिक्त कार्यभार सामाजिक सुरक्षा विभाग, सहा पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, पालीस अंमलदार इरफान पठाण, निलम शिंदे, पुष्पेंद्र चव्हाण, मॅगी जाधव, गणेश पाटोळे, प्रमोद मोहिते, व गणेश ढगे यांच्या पथकाने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.