पुणे – बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या महिलेच्या खूनाचा छडा लावण्यात फरासखाना पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद बहरूल हक (रा.काळेवाडी, मुळ आसाम) याने महिलेचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. खून केल्यानंतर आपल्या मुळ गावी आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला काळेवाडी पिंपरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चाैकशी केली असता, त्याने खूनाची कबुली दिली.
बुधवारी (दि.5) पहाटे तीनच्या सुमारास हक याने त्याच्याच अोळखीतील एका 23 वर्षीय देहविक्री करणाऱ्या महिलेचा खून केला होता. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. दाखल गुन्ह्याच्या अनुषगाने तपास करत असताना, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, संशयित आरोपी काळेवाडी पिंपरी येथील दाैलत हाॅटेलसमोर थांबला आहे. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता, त्याने खूनाची कबुली दिली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ. प्रियंका
नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), अभिजीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अजितकुमार पाटील, पोलीस उप
निरीक्षक, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, वैभव स्वामी, मेहबुब मोकाशी, सयाजी
चव्हाण, मोहन दळवी, सचिन सरपाले, राकेश क्षीरसागर, मयुर भोकरे, अभिनय चौधरी, महंमद हनीफ शौकत शेख, अमोल सरडे, पंकज देशमुख, अजित शिंदे, तुषार खडके, गौतम किरतकुडवे, शरद वाकसे, यांच्या पथकाने केली आहे.