Pune Crime : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सराईत आरोपीला अटक

पुणे – विनापरवाना व बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी पुणे ग्रामीण एलसीबी पथकाच्या पोलिसांनी कामशेत मधून एका सराईत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून १ गावठी पिस्टल व २ काडतुस जप्त करण्यात आले आहे

योगेश केशव गायकवाड (वय २१ वर्ष रा.मु. कांब्रे ता.मावळ जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.अटक हा सराईत असून त्याच्या विरुद्ध यापूर्वीसुद्धा अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी १ गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील कामशेत ते लोणावळा कडे जाणारे NH 4 रोडवर निसर्ग धाब्यासमोर मोकळ्या जागेत आरोपी योगेश विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने कमरेला पिस्तूल बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस एकुण एकावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरचा जप्त मुद्देमाल व आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी कामशेत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर आरोपी हा सराईत असून त्याचेविरुद्ध यापूर्वीसुद्धा अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी १ गुन्हा दाखल असून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गुरन / २०२० भा ह का क. ३(२५) या गुन्हयात तो पाहिजे आरोपी आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक पद्माकर घनवट, पो.उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे,
सफौ. शब्बीर पठाण, पो.हवा. प्रकाश वाघमारे , पो.हवा.सुनिल जावळे, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा मुकुंद आयचीत, पोहवा सुनील वाणी, पोना गुरू जाधव, चापोशी दगडू वीरकर यांनी केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.