Pune Crime | बॅंकर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय; माग काढत हाॅटेलमध्ये मित्रासोबत पकडून बेदम मारहाण, पतीवर गुन्हा

पुणे – पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने पतीने पत्नीचा माग काढत तीला मित्रासोबत एका हॉटेलमध्ये पकडले. यानंतर तीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नगर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात प्रथम अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर पती व त्याच्या सोबतच्या व्यक्तींविरुध्द खूनाचा प्रयत्न आणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका 29 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनूसार आकाश आनंद मान(32,रा.न्यू दिल्ली), सौरभ गौर आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 27 जानेवारी 2021 रोजी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिलेचा आकाश मान हा पती आहे. ती तीचा मित्र जगप्रकाश पांडे याच्यासोबत पुण्यात आली होती. ती नगर रस्त्यावरील एका आलिशान हॉटेलमध्ये मित्रासोबत उतरली. ती तीच्या मित्राच्या खोलीत सामान घेण्यासाठी गेली असतानाच पती इतर दोघांसोबत तेथे दाखल झाला. त्याने तीला चारित्र्याच्या संशयावरुन बेदम मारहाण करुन भिंतीवर डाके आपटले.

यानंतर इतर दोघा आरोपींनी तीला ठार मारण्याची चिथावणी दिली. यानंतर आकाश तीच्या तोंडावर व पोटावर मारु लागल्याने मित्र जगप्रसाद मधी पडला. त्यालाही सर्वांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी रुममधून जीव वाचवण्यासाठी पळत गेली असता, यातील एका आरोपीने तीला पाठिमागून पकडून विनयभंग केला. यानंतर आकाशने तीला गादीवर पाडून तीचा गळा दाबला. तीने प्रतिकार करत पोलीस नियंत्रण कक्षास फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तीचा मोबाईल फेकून देऊन तीला पुन्हा मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करत आहेत.

यातील आरोपी आकाश हा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिकारी होता, त्याने नुकताच राजीनामा दिला असून तो यूपीएसची परिक्षेची तयारी करत आहे. तर फिर्यादी महिला बॅंकर आहे. हे दांम्पत्य हरियाणामध्ये रहाते. फिर्यादी शिक्षणानिमीत्त पुणे शहरात रहात होती. यामुळे ती मित्रांना भेटायचे असल्याचे सांगत पुण्यात येत होती. मात्र पती आकाशला तीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने तीचा माग काढत ती रहात असलेल्या हॉटेलमध्येच खोली बुक केली होती. यानंतर हा सर्व ड्रामा घडला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.