पुणे,दि.4 घराशेजारील मोकळ्या जागेत क्रिकेट खेळू न दिल्याने एका कुटूंबाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बाळु राखपसरे ( वर्ष,रा.चंदवाड,ता.हवेली,जि.पुणे) हे 2 मे रोजीचंदवाडी फुरसुंगी येथे शंकर नाना हरपळे यांचे रिकाम्या जागे मध्ये भाऊ व ओळखीच्या व्यक्तींसह क्रिकेट खेळत होते. यावेळी त्यांच्या वस्तीच्या बाजुला राहणारे यातील आरोपी यांनी तेथे येऊन क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना विरोध केला.
याचा राग मनात धरुन,बेकायदेशिर जमाव जमवुन,सध्याच्या कोविड प्रादुर्भावाच्या काळात शासकीय जमाव आदेशाचा भंग करुन,क्रिकेटच्या बॅंटने व लोखंडी सळईने फिर्यादी व त्यांच्या भावांना मारहाण करुन दुखापत करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड करत आहेत.