पुणे ( Pune crime ) – एका विवाहितेस चारित्र्याच्या संशयावरुन तीच्या सासऱ्याने प्रेग्नन्सी कीट देऊन समोरच टेस्ट करायचा आग्रह धरला. याप्रकरणी पती सासू आणी सासऱ्यासह पाच जणांविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती अभिजीत धावडे, सासरे बापु धावडे (58), सासूसह तीन महिलांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत महिलेचा पती तीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीला सतत मारहाण करत होता.
यातच त्याने तीच्या बदनामीचे स्टेटस स्वत:च्या व्हॉटसअपवर ठेवले होते. तर सासऱ्याने प्रेग्नन्सी कीट आणून देऊन समोरच टेस्ट कर असे बोलून मनास लज्जा उत्पन्न केली. इतर महिला आरोपींनी माहेरुन सोन्याची चेन व कडे आणल्याशिवाय नांदालयला यायचे नाही असे म्हणत मानसिक छळ केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक केंजळे करत आहेत.