Pune Crime: भरदिवसा सराईतांकडून दुकानदारांना पिस्तूलाचा धाक, भेकराईनगरमधील घटना

पुणे – हातात पिस्तूल घेउन दोघा सराईतांनी दुकानदारांना धमकावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनचय सुमारास भेकराईनगरमधील शिवशंकर हाईट्स परिसरात घडली. याप्रकरणी दुकानदाराने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी यांचे भेकराईनगरमधील शिवशंकर हाईट्समध्ये दुकान आहे. काल दुपारी सव्वातीनच्या सुमारास दोघे सराईत त्याठिकाणी आले. त्यातील एकाने फिर्यादीला दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, मी सांगितल्याशिवाय दुकान उघडायचे नाही, आधीच एकाला वर पोहोचवला आहे. आता तुझा नंबर लावून घेउ नको, असे म्हणून त्यांना दुकान बंद करायला लावले. त्याशिवाय दहशत परसवून इतर दुकानदारांनाही दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.