पुण्यात विकृतीची हद्द पार! 16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

पुणे – एका तरुणाने अल्पवयीन मुलाला मुतारीत फरफटत नेऊन अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी सागर पोपट सोनवणे (21,रा.दांडेकर पुल) याला अटक केली आहे.

एका 16 वर्षाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत मुलगा दांडेकर पुलाजवळील बस थांब्यावर त्याच्या मित्रासोबत उभा होता. यावेळी त्याच्या ओळखीचा सागर सोनवणे तीथे आला. त्याने पिडीत मुलाला ओढत फरफटत मुतारीमध्ये नेले. त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. आरोपी सागर सोनवणे हा बिगारी काम करतो. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.