पुणे – औंध गावात बंगल्यात घुसून तीन चोरट्यांनी ज्येष्ठ दांम्पत्याला व त्यांच्या कुकला चाकुचा धाक दाखवत 16 लाखाची जबरी चोरी केली होती. या जबरी चोरी करणाऱ्या तीघांना व त्यांच्या आणखी तीन साथीदारांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून मुख्य आरोपीने एका नर्सिंग ब्युरोमार्फत त्यांच्या घरी केअर टेकर म्हणून तीन महिने काम केले होते.
ही घटना एप्रिल महिण्यात शेवटच्या 25 तारखेला घडली होती. तीघा आरोपींनी जबरी चोरी केल्यावर या दांम्पत्याला पोलीस को खबर करेंगे तो, आपको वापस आके खत्म करेंगे अशी धमकी दिली होती. यानंतर त्यांना बाथरुममध्ये कोंडून चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी 73 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती. गुन्हे शाखा व चतुश्रृंगी पोलीस गुन्हेगारांच्या मागावर होते. संदीप भगवान हांडे ( रा. पिंपळखेडा, पो. वाळूज, ता गंगापूर, जि. औरंगाबाद), मंगेश बंडु गुंडे ( रा. वडीकाळया, पो सुकापुरी, ता अंबड, जि जालना), राहुल कैलास बावणे ( रा. पीर कल्याण सीड, ता.जि. जालना), विक्रम दिपक थापा उर्फ बिके ( रा. विनयनगर, वृंदावन पॅराडाईज, इंदिरानगर, नाशिक), किशोर कल्याण चनघटे ( रा. मु. पिंपरखेडा, पो. वाळूज, ता गंगापूर, जि औरंगाबाद), भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (रा.औरंगाबाद) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
यातील मुख्य आरोपी संदीप हांडे हा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये सिंध हौसिंग सोसायटी या उच्चभु व खाजगी सुरक्षा व्यवस्था असणान्या सोसायटी मध्ये 25 एप्रिलला तीन व्यक्तींनी एका बंगल्यामध्ये प्रवेश केला. तेथे असणाऱ्या कुक व ज्येष्ठ दांम्पत्याला चाकुचा धाक दाखवून घरातील दागिने, पैसे, घडयाळ असा 15 लाख 80 हजार रुपयांचा माल चोरुन नेला. त्यानुसार प्राप्त माहितीचे विश्लेषण केले असता आरोपी हे औरंगाबाद, जालना, नाशिक अशा विविध ठिकाणी असल्याचे समजले. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव व महेश भोसले यांची दोन पथके तयार करुन सहा आरोपींना अटक केली.
अटक केलेल्या आरोपीतांकडून तीन मोटार सायकल, सोन्याचे हिन्याचे दागिने, कॅमेरा असा एकूण किंमत रूपये 17 लाख 50 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. अटकेतील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर पुणे, औरंगाबाद, जालना येथील विविध पोलीस ठाणेस एकुण 7 गुन्हे दाखल आहेत. तसेच दाखल गुन्हयातील आरोपी संदीप भगवान हांडे हा गोंदी पोलीस ठाण्यातील (ता अंबड, जि जालना) गुन्हयामध्ये फरार असून तो दाखल गुन्हयात पाहिजे आरोपी आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख, परिमंडळ पुणे शहर व मा.सहा.पोलीस आयुक्त रमेश गलांडे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड,पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, महेश भोसले व पोलीस अंमलदार दिनेश गडांकुश, मुकुंद तारू, श्रीकांत वाघवले, प्रकाश आव्हाड,प्रमोद शिंदे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर मुळे, सुधाकर माने, जारवाल यांच्या पथकाने केली आहे.