पुणे – घरात घुसून शेजारच्याने एका महिलेचा जबरदस्तीने किस घेऊन विनयभंग केला. ही घटना वैदवाडी येथील जुना म्हाडा कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात माणिक शिवराम शिंदे(50) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार 45 वर्षीय महिला दुपारच्या सुमारास तिच्या घरात स्वयंपाक करत होती. यावेळी माणिक अचानक तीच्या स्वयंपाकघरात घुसला. तिला काही कळायच्या आतच तीला पाठीमागून जोरात आवळून तोंडात तोंड घालत किस घेतला.
यानंतर तीला शरीर संबंधाची मागणी केली. या घटनेने गांगरुण गेलेल्या महिलेने आरडा ओरडा केल्यावर माणिकने पळ काढला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोमण करत आहेत.