पुणे – माहेरहून घर खर्चासाठी पैसे आणण्यासाठी तसेच अनैतिक संबंधावरून पतीला काही बोलू नये म्हणून पत्नीला शिवीगाळ करत तिच्या नारळ कापण्याच्या कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पतीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण संदिप लोंढे (रा. श्रमीक वसाहत, कर्वेनगर,पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २८ वर्षीय पत्नीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१८ ते ८ एप्रिल २०२१ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण हा फिर्यादीचा पती असून त्याने नवीन घर घेतल्यामुळे त्या घरासाठी तसेच घर खर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत अशी मागणी केली. फिर्यादीने माहेरहून ५० हजार रूपये आणले असता अजुन पैसे आणावे असा तगादा लावून व त्याच्या अनैतिक संबंधावरून त्याला काही बोलु नये म्हणून तिला वेळोवेळी मारहाण केली. तसेच तिचा मानसिक व शाररिक छळ केला तसेच २६ एप्रिल रोजी नारळ कापण्याच्या कोयत्याने तिच्यावर करून तिला गंभीर जखमी केले. याबाबत वारजे माळवाडी पोलीस पुढील तपास करत आहे.