पुणे – अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीस दुधातून झोपेच्या गोळ्या देत ,गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर तो करोनाने मेला असल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी केवळ एका खबरीच्या आधारावर हा खूनाचा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी एका महिलेसह तीच्या प्रियकरास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
गौरव मंगेश सुतार (रा.उत्तमनगर,मंतरवाडी ता. हवेली जि.पुणे) व आश्विनी मनोहर हांडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 24 मे रोजी सकाळी 6 वाजता मनोहर नामदेव हांडे ( रा.उरूळीदेवाची ता. हवेली जि.पुणे) हा त्याचे रहाते घरी मृत अवस्थेत मिळाला होता.
त्याबाबत मयताची पत्नी आश्विनी हांडे हिने तिचा पती मनोहर हा कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे सांगीतले होते. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास पोलीस उप-निरीक्षकनिकेतन निंबाळकर हे करीत होते.
तसेच समांतर तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन तपास पथक करीत असताना दि. 4 जून रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर व पोलीस कॉन्सेबल दिगंबर साळुके यांना मनोहर हांडे याचे मरणाबाबत साशंकता असल्याची खबर मिळाली.
त्यानुसार तपास करता मयताची पत्नी आश्विनी मनोहर हांडे हिचे गौरव मंगेश सुतार (रा.उत्तमनगर,मंतरवाडी ता. हवेली जि.पुणे) याचेसोबत विवाहबाहय अनैतीक संबंध असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाने गौरव सुतार व आश्विनी हांडे यांचेवर पाळत ठेवली.
तसेच पोलीस नाईक श्रीनाथ जाधव यांनी तांत्रीक विश्लेषणाचे आधारे प्रथम गौरव सुतार यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केला असता त्याने व आश्विनी हांडे हिने मिळुन मनोहर हांडे
त्याचेकडे तपास केला असता त्याने व आश्विनी हांडे हिने मिळुन मनोहर हांडे यांस सुरूवातीला झोपेच्या गोळया देवुन बेशुध्द केले व नंतर त्याचे तोंड व गळा दाबुन खुन केल्याचे कबुल केले . तर आश्विनी हांडे हिस ताबेत घेवुन दोघांकडे अधिक तपास करता, त्यांनी सांगितले की, त्यांचे सुमारे दोन वर्षापासुन प्रेमसंबंध असुन आश्विनी हिचा पती मनोहर यास प्रेमसंबंधाबाबत समजले होते.
तसेच मनोहर हा कोरोना पॉझीटीव्ह असल्याने सुमारे 15 दिवसांपासुन घरीच राहुन उपचार घेत असल्यानेअनैतीक संबंधास अडसर ठरत होता. त्यामुळे यांनी मनोहर याचा खुन करून तो कोरोनाने मेल्याचा बनावाचा कट रचला होता. त्याप्रमाणे दि. 30 मे रोजीच्या रात्री गौरव याने आश्विनी हिस झोपेच्या गोळया आणुन दिल्या.
आश्विनीने त्या गोळया मनोहरला दुधामधुन दिल्या. त्यानंतर मनोहर झोपल्याची खात्री झालेवर गौरव याने मनोहर याचे घरी जावुन आश्विनी व गौरव या दोघांनी मिळुन मनोहर याचा तोंड व गळा दाबुन खुन केला. त्यानंतर गौरव तेथुन निघुन गेला व आश्विनी हिने वरील मजल्यावर राहणारी तिचे आईस मनोहर हा झोपेतुन उठत नाही असे सांगुन तो झोपेतच कोरोना आजाराने मेला असल्याचा बनाव केला.
तीने पोलिसांनाही देखील मनोहर हा कोरोनामुळे मयत झाला असल्याचे सांगितले होते. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात मनोहरचा गळा दाबल्याने व श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे पुढे आले होते. सुरवातीला पोलिसांनी अकस्मात मयत नोंद दाखल करुन पुरावा उपलब्ध नसताना फक्त मिळाले खबरिच्या आधारे कौशल्याने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस.
याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) सुभाष काळे हे करीत आहेत. ही कामगिरी तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर, उपनिरीक्षक केतन निंबाळकर, पोलीस अंमलदार नितीन गायकवाड,
शंकर नेवसे, अमित साळुके, श्रीनाथ जाधव, सुनिल गलोत, प्रमोद गायकवाड,रोहीदास पारखे, दिगंबर साळुके, निखील पवार, राजेश दराडे, बाजीराव वीर, लेश कुदळे यांचे पथकाने केली आहे.