पुणे – शहरातील दत्तवाडी भागात सात ते आठ जणांच्या टोळक्यानी एकत्र येत सपासप वार करून एका अल्पवयीनाचा खून केल्याची घटना आज रात्री घडली.
याबाबतची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सौरभ तानाजी वाघमारे (18) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहीतीनूसार, रात्री नऊ वाजताच्या सुमारास पर्वती पायथा परिसरात 7 ते 8 जणाच्या टोळक्याने सौरभ याला पकडले. त्यानंतर हत्याराने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली.
घटनेनंतर टोळके पसार झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. दरम्यान खून करण्यामागचे कारण समजू शकले नाही.