पुणे – बियरच्या बॉटल्स डोक्यात फोडून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लस व्हॅलीत फेकून दिला. याप्रकरणी पौड पोलिसांनी अटक केलेल्या युवकाला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अन्य एक जण न्यायालयीन कोठडीत आहे.
सागर खोपडे (29) असे पोलीस कोठडी सुनावण्यात अलेल्याचे नाव आहे. दीपक चव्हाण (33) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत 31 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. 4 एप्रिल रोजी पुणे-माणगाव मार्गावरील प्लस व्हॅली (दरी) परिसरात ही घटना घडली.
दीपक आणि सागर यांच्यात वाद झाले होते. या सागरने दीपकचा खून करून मृतदेह फेकून दिला. तसेच त्याचा मोबाइल फोडून झाडीत फेकून दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सागर याला न्यायालयात दाखल केले असता, नक्की कोणत्या कारणासाठी खून करण्यात आला, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? यासह गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.