पुणे,दि.8- लष्कर परिसरात कचारा गोळा करणाऱ्या व्यक्तीचा खून करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने 24 तासात अटक केली आहे. खून करणाऱ्या व्यक्तीस नशा करण्याचे व्यसन होते. तो नेहमी मृत रहात असलेल्या ठिकाणी नशापाणी करण्यास येत होता. यावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून हा खून झाला असल्याचे उघड झाले आहे. मोहंमद आझाद सुक्कसाब शाह(21,रा.मोदिखाना, लष्कर, मुळ बिजनोर,उत्तरप्रदेश ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
इस्माईल शेख याचा अज्ञात व्यक्तीने खुन केल्याचा गुन्हा 6 एप्रिल रोजी लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी गुन्हयातील आरोपीचा गुन्हे शाखा युनिट 2 कडुन समांतर तपास सुरु होता. प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी लागलीच गुन्हयाचे तपासाकरीता सहायक पोलीस निरीक्षक मोरे व भोसले यांची दोन पथके तयार करुन तपास चालु केला. यातील मयत इसम कचरा गोळा करुन तो आपली उपजिविका करत होता. त्याचे वर्तन देखिल व्यवस्थित असल्या बाबत आजुबाजुच्या लोकांनी माहिती दिली होती. त्यामुळे मयत व्यक्तीचा खुन कोणी व कोणत्या कारणासाठी केला ही बाब निष्पन्न करणे कठिण जात होते.
गुन्हयाचे तपासा दरम्यान युनिट कडील पोलीस नाईक मोहसिन शेख यांना खबर मिळाली की, ज्या ठिकाणी खुन झाला त्या ठिकाणा जवळ राहणारा मोहंमद आझाद शाह हा त्याचा भाऊ व भाभी सोबत राहत असुन त्याला नशापाणी करण्याचे व्यसन आहे. त्या कारणावरुन मयत ईस्माईल शेख यांनी त्याला वेळोवेळी तेथे नशापाणी न करण्याबाबत बजावुन सांगीतले होते. त्यामुळे त्याचा मयत इसमावर राग होता. त्या माहीतीवरुन सदर मोहंमद शाहला ताब्यात घेण्यात आले. त्यास युनिट 2 कार्यालयात आणुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता सुरवातीस त्याने उडवाउची उत्तरे दिली. परंतु कसुन तपास केल्यानंतर त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला गुन्हा करण्याचे कारण विचारले असता मयत इसम हा आरोपीला वारंवार टोचुन बोलत होता. त्या ठिकाणी नशा पाणी करुन देत नव्हता, तु तुझे गावाला यु.पी. ला परत जा असे बोलत होता. त्यामुळे त्या विषयी त्याचे डोक्यात राग होता.
या बाबत मयत ईस्माईल आरोपीच्या भाभीला उलटसुलट सांगत असल्याने त्याचे डोक्यामध्ये राग भरला होता. त्याने त्याचे भाभीला मयत ईस्माईलीा बोलु नका असे सांगीतले तरी मयत इसमाशी त्या बोलत होत्या . यामुळे ईस्माईलचा इसमाचा काटा काढायाचे ठरविले. त्यानुसार घटनेच्या दिवशी ईस्माईल झोपलेला असताना त्याचे डोक्यात दगड घालुन त्याचा खुन केला व परत घरात जावुन झोपल्याचे सांगितले.
ही कामगिरी सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, .पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, प्रकाश मोरे, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस अंमलदार किशोर वग्गु, नामदेव रेणुसे, मोहसिन शेख, उत्तम तारु, चेतन गोरे, समिर पटेल, मितेश चोरमोले, गोपाल मदने यांनी केली आहे.