पुणे – हांडेवाडी परिसरात बेपत्ता झालेल्या 20 वर्षीय तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह मातीत गाडल्याचा प्रकार समोर आला होता. या खुनाचे गूढ उकलले असून, मित्रानेच हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संबंधित युवक त्याच्या लग्नानंतर मित्रासोबत पूर्वीप्रमाणे फिरत नव्हता. याच कारणातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
किरण रोहिदास हांडे ( 20, रा. उरूळी कांचन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत सतीश चव्हाण (रा. हांडेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, किरणचा प्रेमविवाह झाला होता. तो हांडेवाडी परिसरात पत्नीसोबत राहत होता. तो एका गॅरेजमध्ये काम करत होता. याच परिसरात त्याचे तीन ते चार मित्र आहेत. हे सर्व मित्र व्यसनी आहेत. किरणने विवाह झाल्यापासून त्यांची संगत सोडली होती. याचा राग सतीशला होता. त्याने त्यासंदर्भात जाबही विचारला होता.