Pune Crime : लोणी काळभोर पोलीस ठाण्यांतर्गत ‘एमपीडीए’ची पहिली कारवाई

सराईताविरूद्ध एक वर्ष स्थानबद्धतेची कारवाई

पुणे – ग्रामीण हद्दीतून पोलीस आयुक्तालयात समाविष्ट झाल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यातंर्गत सराईताविरूद्ध पहिल्यांदाच एमपीडीए कायद्यानुसार कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणादले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित गुन्हेगाराला एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ऋषिकेश सुरेश पवार (वय २३, रा. कदमवस्ती, लोणीकाळभोर ) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे.

पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून लोणी काळभोर पोलीस ठाणे नुकतेच पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आले आहे. यापुर्वी संबंधित पोलीस ठाण्यातंर्गत कोणत्याही गुन्हेगाराविरूद्ध एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, आता पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील ऋषिकेश पवार याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

२०१७ पासून त्याच्याविरूद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये जीवघेणी हत्यार बाळगणे, खूनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, दंगा, दुखातप करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी ऋषिकेश पवार विरूद्ध एमपीडीए नुसार कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यास मंजूरी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.