पुणे – खुनाचा प्रयत्न करुन दहशत माजवणाऱ्या चुहा गॅंगचा म्होरक्या लतिफ वागवान टोळी विरुध्द मोक्का कायद्याअंतर्गत भारती विद्यापीठ पोलीस ठाणेकडून कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आपल्या टोळीच्या गुन्हेगारी हालचालींची माहिती पोलीसांना देतो या संशयावरुन चुहा गॅंगचा म्होरक्या साकिब मेहबुव चौधरी ऊर्फ लतिफ वागवान (24, रा संतोषनगर, कात्रज) याने कट रचुन त्याचे टोळी सदस्य चंद्रशेखर उर्फ शेखर ठोंबरे (20 रा. कात्रज ), अझरुद्दीन दिलावर शेख (27 रा. कात्रज ), तनवीर जमीर सय्यद (19 रा. कात्रज ), ऋतिक चंद्रकांत काची (19रा. कात्रज) यांनी दिनांक 3/7/21 रोजी दत्ता नथु जाधव (44 रा.कात्रज) याच्यावर संतोषनगर परिसरात कोयत्यान हल्ला करुन जिवे ठार
मारण्याचा प्रयत्न केला होता. जाधव यांचे फिर्यादी वरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. टोळी प्रमुख साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवानसह त्याचे साथिदारांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.
सदर चुहा गॅंग मधील अटक आरोपींवर संघटीतपणे यापुर्वी सन 2017 पासुन गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान याने प्रत्येक गुन्हयाचे वेळी सोबत वेगवेगळे साथीदार घेवुन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्याकरीता जबरी चोरी, खंडणी, मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशिर हत्यार जवळ बाळगणे, सरकारी कामात अडथळा आणने यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीप्रमुख व त्याचे टोळीचे सदस्य यांना गुन्हेगारी कृत्यांपासुन परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारी सारखी ठोस कारवाई करुन देखील त्यांचे गुन्हेगारी वर्तनात काही एक चांगला परिणाम झालेला नव्हता. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, सर्व्हलन्स पथकातील सहायक पोलीन निरीक्षक वैभव गायकवाड पोलीस अंमलदार कृष्णा बढे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे व अमित शेडगे यांनी मोक्काचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता.