पुणे – सिंहगड रस्ता परिसरात एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजले नाही.
राधिका पवन ससाणे (वय २६, रा. माधुरी मिलींद काॅम्प्लेक्स, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता ) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. राधिका आणि तिचे पती माधुरी मिलींद काॅम्प्लेक्स इमारतीत चौथ्या मजल्यावर राहतात. शनिवारी ( २३ ऑक्टोबर ) सकाळी साडेआठच्या सुमारास राधिकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
इमारतीच्या तळमजल्यावर काहीतरी पडल्याचा आवाज झाल्याने रहिवाशांनी डोकावून पाहिले. तेव्हा राधिका गंभीर जखमी अवस्थेत तळमजल्यावर पडली हाेती. या घटनेची माहिती त्वरीत पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक डी. बी. खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. राधिकाला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राधिकाच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सरू असून सिंहगड पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.