Pune Crime | लेफ्टनंट कर्नलनेच फोडला सैन्यभरतीचा पेपर; खंडणी विरोधी पथकाकडून कर्नलसह दोघांना अटक

पुणे, दि. १८ – स्थलसेनेत विविध पदासाठी भरतीचा लेखी पेपर दिल्लीतील लेफ्टनंट कर्नलनेच फोडल्याचे धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित कर्नलसह साथीदाराला खंडणी विरोधी पथकाने दिल्लीतून अटक केली आहे. भगतप्रितसिंग बेदी असे अटक केलेल्या लेफ्टनंट कर्नलचे नाव आहे. त्याचा साथीदार वीरप्रसाद याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

सैन्य दलात शिपाई भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांना पुणे पोलिसांनी यापुर्वीच अटक केली आहे. याप्रकरणी वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात होणारी सैन्यदलाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. माळेगाव, बारामती) माधव शेषराव गित्ते (वय ३८, रा. सॅपर्सविहार कॉलनी, पुणे), गोपाळ युवराज कोळी (वय ३१, रा. दिघी) आणि आणि उदय दत्तू आवटी (वय २३, रा. खडकी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. यातील कोळी आणि आवटी हे सैन्य दलातील कर्मचारी आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.