पुणे,दि.25- महिलेच्या अंगावर गाडी घालून तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना घोरपडीतील पंचरत्न मार्केट जवळ घडली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी 39 वर्षीय महिला पतीसमवेत रस्त्याने जात असताना नातेवाईक असलेल्या एका आरोपीने तीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर तीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर ती पतीसह पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी जात असताना, आरोपी चाकू घेऊन तीच्या पतीस मारण्यासाठी धावून आले.
यावेळी तीने हाताने चाकू अडवला असता, तीच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. यानंतर आरोपींनी तीला जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे करत आहेत.