Pune Crime | स्पेअरपार्ट देत नसल्याच्या रागात दुकानदारावर चाकूने वार; दोन सख्ख्या भावांना अटक

पुणे ,दि.11 – स्पेअरपार्ट देत नसल्याच्या रागातून गॅरेज चालकाच्या मानेवार चाकुने वार करून त्याला गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी दोन सख्या भावांना अटक केली. हा प्रकार वाघोली येथील लोहगाव रोडवरील सातव वस्ती येथे घडला.

सागर मनोहर होसमणी (27) आणि रोहित मनोहर होसमणी (28, रा. विश्रांतवाडी,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी प्रविण गिरीधर लाल सोलंकी (, सातववस्ती, लोहगाव,पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली.

फिर्यादी यांचे गॅरेज असून दोन्ही आरोपींनी त्यांच्या गॅरेजवर येऊन आम्हाला तु स्पेअरपार्ट देत नाही का, थांब तुझ्याकडे बघतो म्हणत चाकूने त्यांच्या मानेवर वार करून गॅरेज मधील सामानाची तोडफोड केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पोलिस हवालदार एन सकाटे तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.