आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावीची ‘मॅनेजर’ पोलिसांच्या जाळ्यात; गोवंडी मुंबई येथून केली अटक

पुणे – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार  करण्यात आलेल्या किरण गोसावी याची मॅनेजर शेअरबानु ईरफान कुरेशी (वय.27,रा. गोवंडी मुंबई) हिला पुणे पोलिसांनी अटक केली.

गोसावी याने नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांना आर्थिक गंडा घातला आहे. त्याने तरुणांकडून घेतलेले पैसे शेअरबानु हिच्या बँक खात्यावर आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. त्यानुसार तिला अटक करण्यात आल्याची माहिती फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी किरण गोसावी याच्या विरुद्ध नुकतीच लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. क्रुज पार्टीतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात गोसावी हा साक्षीदार आहे.  2018 मध्ये पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात  गोसावी व त्याची मॅनेजर शेअरबानु यांच्यावर  फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. तेव्हा पासून ते दोघे फरार होते. गोसावी याची मॅनेजर म्हणून काम करत असताना तिच्या खात्यावर तीन लाख रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

आर्यन खान याला पकडून एनसीबी कार्यालयात नेताना गोसावी दिसून आला होता. राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी केलेल्या आरोपानंतर गोसावीचे नाव चर्चेत आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.