पुणे – भारत सरकारने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद याचा साथीदार आफताब हुसैन शाह (वय 28, रा. किश्तवार, जम्मू आणि काश्मीर) याला काश्मीर येथून अटक केली होती.
दरम्यान जुनेद याच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासात त्याची 15 फेसबुक, 7 सात व्हॉटसअप खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून 11 सिमकार्ड मिळून आली आहे. या खात्यात शेकडो लोक सहभागी असून त्यांच्याकडे तपास कारवायांचा आहे अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे.
दरम्यान विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी जुनेद यास सात जूनपर्यंत, तर आफताब यास 14 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.