पुणे – गावाला जाताना शेजारच्यांना घरातील झाडांना पाणी देण्यासाठी घराची चावी देणे एका कुटूंबास चांगलेच महागात पडले आहे. या शेजारी रहाणाऱ्या कुटूंबाने घरातील तब्बल 23 लाखाचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात पती-पत्नी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गौरव आदर्श गेरा (रा. अभिलाषा सोसायटी, वाघोली) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गैरा हे कुटूंबासह ऑक्टोबर महिण्यात गावाला गेले होते. जाताना त्यांनी शेजारी रहाणाऱ्या जोडप्यास घराची चावी दिली होती. त्यांना घरातील झाडांना पाणी घालण्याची विनंती केली होती.
दरम्यान १९ नोव्हेंबरला ते परत आले. काही दिवसांनी त्यांनी घरातील कपाट उघडून तपासले असता, त्यातील तब्बल २३ लाखाचे दागिने चोरीला गेल्याचे आढळले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणाच तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.