पुणे – गणपती विर्सजनचे अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पाेलीस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्रात शुक्रवारी रात्री नऊ ते शनिवारी मध्यरात्री दाेन वाजण्याचे दरम्यान काेबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात हाॅटेल, लाॅजेस, ढाबे, एसटी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयित व्यक्ती व घटनांची कसून तपासणी करण्यात आली. त्याचसाेबत तपासणी अभियानात एकूण एक हजार ६६८ गुन्हेगारांना तपासण्यात आले व त्यापैकी ४२४ गुन्हेगार मिळून आल्याची माहिती पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
सदर काेबिंग ऑपरेशन मध्ये अर्म अॅक्टच्या १५ केसेस करण्यात आले असून १३ काेयते, दाेन तलवार, एक पालघन जप्त करण्यात आली. सात तडीपार आराेपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पाेलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. जबरी चाेरीच्या गुन्हयातील एका आराेपीस अटक करुन त्याच्याकडून १५ हजार रुपयांचा माेबाईल जप्त करण्यात आला.
दराेड्याचे तयारीत असलेल्या तीन आराेपींना युनिट सहाच्या पथकाने जेरबंद करत त्यांच्याकडून कारसह दराेडयातील चार लाख रुपये किंमतीचे सामान जप्त करण्यात आले. खंडणी विराेधी गुन्हे शाखेने फरासखाना पाेलीस ठाण्यातील माेक्का गुन्हयातील आराेपी मेहराज शेख यास अटक केली. तर, अंमली पदार्थ विराेधी पथकाने सहा केसेस मध्ये २४ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. मुंबई प्राेव्हिबिशन अॅक्ट प्रमाणे चार केसेस करत एका आराेपीस अटक करुन १०१ लिटर गावठी दारु व एक टेम्पाे असा तीन लाख रुपयांचा माल जप्त केला.
सीआरपीसी कायदा प्रमाणे १४६ आराेपी विररुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पाेलीस आयुक्त क्षेत्रातील एकूण ५२५ हाॅटेल, लाॅजेसची तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेने एकूण २२७ रिक्षांवर तसेच इतर ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढील काळातही काेबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा पाेलीसांनी दिला आहे.