Pune Crime : खराडी भागात भरदिवसा घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

पुणे – शहरात निर्बंध लागू असताना भरदिवसा सदनिकांचे कुलुप तोडून ऐवज लांबविण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. खराडी भागातील एका सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी भरदिवसा सदनिकेचे कुलुप तोडून तीन लाख ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली.

याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार खराडी बाह्यवळण मार्गावरील रक्षकनगर सोसायटीत राहायला आहेत. सोमवारी (१९ जुलै) त्या दुपारी पावणेतीनच्या सुमारास सदनिकेचा दरवाजा बंद करून कामानिमित्त बाहेर पडल्या होत्या.

चोरट्यांनी सदनिकेचे दरवाज्याचे कुलुप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून दागिने तसेच देवीची मूर्ती असा ऐवज लांबविला. तक्रारदार अध्र्या तासाने घरी परतल्या तेव्हा सदनिकेचे कुलुप तोडून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. पी. जाधव तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.