पुणे – शहरातील वारजे रामनगर परिसरात अवैधरित्या साठविलेल्या गावठी दारूसाठा उध्वस्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनीट तीनने त्याठिकाणी छापा टाकून २ हजार ५५५ लीटर गावठी दारू आणि तीन मोबाईल असा १ लाख ९० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनीट तीनचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वारजे माळवाडी परिसरात खान वस्ती रोड रामनगर हद्दीत गावठी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे यांना मिळाली.
गुन्हे पथकाने सापळा रचून त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी प्लॉस्टिक कॅनमध्ये गावठी हातभट्टीची तयार दारु मिळुन आली. त्याठिकाणाहून २ हजार ५५५ लिटर गावठी दारु आणि ३ मोबाईल असा १ लाख ९० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला . याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रकुमार देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, राजेंद्र मारणे, संतोष क्षिरसागर, दिपक मते, एकनाथ कंधारे, संदीप तळेकर, सुजित पवार, प्रकाश कट्टे, दिपक क्षीरसागर, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.