Pune Crime | पॉर्न फिल्म दाखवत पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; फिल्मप्रमाणे ऍक्‍ट न केल्यास आत्महत्येची धमकी

पुणे – मोबाईलवर पॉर्न फिल्म दाखवत त्याप्रमाणेच पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाह ठरवताना मुलगा मानसोपचार तज्ञाकडे उपचार घेत असल्याचे लपवून ठेवल्याने सासू सासऱ्यांविरुध्दही गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एका तीस वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनूसार हा गुन्हा दाखल केला गेला आहे. हा प्रकार ऑक्‍टोबर 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान घडला आहे. विवाहिता सासरी नांदत असताना तीचा पती मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म दाखवत होता.

यानंतर जबरदस्तीने तीच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार करत होता. तीने नकार देताच दोघेही मोठ्या गाडीखाली आपली गाडी घालून आत्महत्या करुन अशी धमकी देत होता. दरम्यान फिर्यादीला या घटनेमुळे धक्का बसलेल्या पत्नीने पतीच्या वर्तनाची माहिती काढली असता, त्याच्यावर मानसोपचारतज्ञाकडे उपचार सुरु असल्याचे समजले.

विवाह ठरवताना पतीच्या आई-वडिलांनी ही माहिती लपवून ठेवली होती. यामुळे त्यांच्यासहा एकूण चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.